कुदळवाडीत चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली
पिंपरी l प्रतिनिधी
कुदळवाडी चिखली येथे अज्ञात चोरट्यांनी रुद्र मोबाईल अँड गिफ्ट गॅलरी हे दुकान फोडले. दुकानातून 94 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री अकरा ते गुरुवारी (दि. 10) पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत घडली.
मनोज विठ्ठल हाके (वय 23, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुडाळवाडी येथे रुद्र मोबाईल अँड गिफ्ट शॉपी नावाचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी रात्री अकरा वाजता त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचा पात्र उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून मोबाईल फोन, ब्ल्यूटुथ ऍक्सेसरीज, स्मार्ट वॉच, लॅपटॉप असा एकूण 94 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे तपास करीत आहेत.