ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

ओंकार पाटीलची “यू के” मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड…

पिंपरीः शहरातील इंदिरा महाविद्यालय वाकडमधून “बी बी ए” उत्तीर्ण झालेला विद्यार्थी ओंकार पाटील याची ‘युनायटेड किंगडम’ मध्ये पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रमासाठी नुकतीच निवड झाली. ओंकार नॉटींघम विद्यापीठात डिजिटल मार्केटिंग विषयामध्ये पदव्युत्तर उच्च शिक्षण पूर्ण करणार आहे.

या विषयामध्ये उच्च स्तरावर निवड होणे शहरासाठी भूषावह बाब आहे असे प्रतिपादन प्रोफेसर व मार्गदर्शक पियुष दिक्षित यांनी केले. परदेशात उच्च शिक्षणासाठी कठीण मेहनत करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कौशल्य प्राप्त करता येते.स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त होते असे स्पष्ट मत इंदिरा महाविद्यालयाच्या डीन अंजली कालकर यांनी व्यक्त केले. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा प्राप्त होत राहील यात शंका नाही असे मत प्रोफेसर स्वप्निल खराडे, रिचा मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी व व्यावसायिक सराव करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये संशोधन फार महत्वाचे आहे असे मत निवड झालेल्या ओंकार पाटील याने व्यक्त केले. सप्टेंबर २०२३ ते २०२४या वर्षाच्या डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमकरिता विशेष मार्गदर्शन अँटलास स्टडी कन्सल्टट चे राकीम सुलतान, जैद सुलतान, विपुल केसरवानी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button