breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवासंबंधी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Ganesh Utsav 2023 : अवघ्या काही महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. राज्यात काही ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र अशातच यंदाच्या वर्षी देखील पीओपीच्या मूर्तींचा मुद्दा चर्चेत आला आहे. यंदाच्या वर्षी देखील पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने एक अस्थायी धोरणही तयार केले असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली आहे.

राज्य सरकारने हायकोर्टात नेमकं काय म्हटलं?

उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत ही जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या उप सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. त्यानुसार, पीओपीच्या समस्येवर राज्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रदूषण करणारे घटक पीओपीतून हटवून त्याद्वारे मूर्ती तयार करणे शक्य आहे की नाही याबाबतचा आपला अहवाल तीन महिन्यांत राज्य सरकारला सादर करणार आहे.

हेही वाचा – ‘मणिपूरमध्ये सरकारने भारतमातेची हत्या केली!’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने हे धोरण स्वीकारले आहे. सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी सर्व स्थानिक स्वराज संस्था तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असंही शपथपत्रात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button