breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस, स्मृती इराणींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार पलटवाल केला. त्या बोलत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. यावेळी त्यांनी फ्लाईंग किस केल्याचा गंभीर आरोप स्मती इराणी यांनी केला आहे.

स्मृती ईराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांची फ्लाईंग किस देण्याची कृती चुकीची आहे. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तर एक महिला विरोधी व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकतो. असा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही. यावरून ते महिलांबाबत काय विचार करतात हे दिसून येतं. ही अभद्र आणि आक्षेपार्ह कृती आहे, अशी टीका स्मृती ईराणी म्हणाल्या.

हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवासंबंधी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

 

दरम्यान, राहुल गांधी हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही कृती केल्याचं सांगितलं जातं. राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली पडल्या. त्यामुळे या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असता त्यांना पाहून भाजपचे खासदार हसायला लागले. त्यावर राहुल गांधी यांनी या हसणाऱ्या खासदारांना फ्लाईंग किस दिला आणि तिथून हसत निघून गेले, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button