ताज्या घडामोडीपुणे

मुख्य मंदिरामध्ये ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे गणेश कुंडामध्ये विसर्जन

पुणे | मंगलमूर्ती मोरया… दगडूशेठ मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले.विविधरंगी फुलांनी सजविलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

रविवारी सायंकाळी 5.20 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले.हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने अनुभविला. लस घेऊन कोरोनाला हद्दपार करू या… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिराबाहेर काढण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button