breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri : माजी नगरसेवक सुरेश गदिया यांचे निधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश हस्तीमल गदिया (वय- ६६) यांचे आज मंगळवारी पहाटे ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, तीन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

चिंचवड स्टेशन येथील पंकज ट्रेडिंग कंपनी या प्रख्यात स्टेशनरी दुकानचे ते संचालक होते. भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते. भाजपच्या शहर कार्यकारणीत ते कार्यरत असत. सन २००२ मध्ये महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा  –  ‘पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध’; उपमुख्यमंत्री अजित पवार 

शहरातील व्यापाऱ्यांचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. केशवनगर येथील नवीन स्मशानात सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button