breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आता बूस्टर डोस गरजेचा राहणार! तज्ज्ञांचा दावा

न्यूयॉर्क – आता कोरोनापासून पूर्ण सुरक्षितता मिळविण्यासाठी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेणे गरजेचे राहणार असल्याचा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ.अँथनी फौसी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी इम्युनिटी कमी असल्यास बूस्टर डोसचे समर्थन केले आहे.

एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन पॅनेलने १६ वर्षे वयावरील लोकांना तिसरा डोस देण्यास नकार दिल्यानंतर डॉ. अँथनी फौसी यांनी हे आपले मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात फायझर कंपनीने एफडीएला ५२ पानी सादरीकरण करताना तसा प्रस्ताव दिला आहे. यात इस्राईलने केलेल्या अभ्यासाचा डेटाही समाविष्ट आहे. त्यानुसार इंजेक्शननंतर ६० वर्षांवरील लोकांना अशा संसर्गजन्य आणि गंभीर आजारांपासून वाचविण्यासाठी बूस्टर डोस उपयोगी पडत असल्याचे म्हटले आहे. त्यास राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारनेही समर्थन दिली होते. मात्र एफडीए पॅनेलने ६५ वर्षांवरील लोकांना फायझरचा बूस्टर डोस देण्यास मान्यता दिली आहे. यावर डॉ. अँथनी फौसी यांनी टेलिग्राफशी बोलताना म्हटले आहे की, इम्युनिटी कमी असल्यास बूस्टर डोस घेण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यासंदर्भातील अमेरिकेची आकडेवारी आपल्याला स्पष्ट दिसत आहे. त्यासोबत इस्राईलच्या अभ्यासाचा डेटाही आहेच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button