breaking-newsराष्ट्रिय

ICC Test Rankings; अष्टपैलू बेन स्टोक जगात नंबर वन

नवी दिल्ली : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक याने आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. नुकत्याच वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात स्टोकने 250 पेक्षा जास्त धावा आणि 3 बळी मिळवून इंग्लंडला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्याच्या याच खेळीचा फायदा त्याला आयसीसी कसोटी क्रमवारी तसेच अष्टपैलू क्रमावारीत झाला आहे. बेन स्टोक्सने विरोधी संघाचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

या सामन्यापूर्वी बेन स्टोक्स आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत क्रमांक दोनचा अष्टपैलू खेळाडू होता, परंतु मॅनचेस्टर कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली छाप पाडत तो जगातील प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू ठरला आहे. इतकेच नव्हे तर त्याने फलंदाजीच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर, मार्नाश लबूशेणे, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केन विल्यमसन, बाबर आझम यांना सुद्धा मागे टाकले आहे. अष्टपैलू क्रमवारी अव्वल स्थान पटकविणाऱ्या स्टोकने, फलंदाजी क्रमवारीतही तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लडकडून अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी 2006 साली अँड्र्यू फ्लिंटॉफने अष्टपैलू कसोटी क्रमावारीत अव्वल स्थानावर झेप घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button