breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

समृद्धी महामार्ग ः उद्धाटनाच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सर्वात शेवटी

  • संजय राऊतांची समृद्धी महामार्गावरून शिंदेंवर टीका

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्धाटनाच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सर्वात शेवटी लावण्यात आला होता. बाळासाहेबांचे नाव दिले जात आहे म्हणून आपले मुख्यमंत्री फार भावूक झाले होते. हे ढोंग आहे. फक्त पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. पण तिथे कुठेच बाळासाहेबांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राहिल असे वर्तन कोणीही केले नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्धाटनाच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सर्वात शेवटी लावण्यात आला होता. त्यावरून संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, “बाळासाहेबांचे नाव दिले जात आहे म्हणून आपले मुख्यमंत्री फार भावूक झाले होते. हे ढोंग आहे. फक्त पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. पण तिथे कुठेच बाळासाहेबांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राहिल असे वर्तन कोणीही केले नाही”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ताऱ्यांसदर्भात भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्राला आम्ही विकासाचे ११ तारे देत आहोत. या ११ ताऱ्यांमधील पहिले दोन तारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हे आहेत. या दोन्ही ताऱ्यांचा तिकडे अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज तारा नव्हे तर सूर्य आहे. त्या सूर्यावर थुंकणारे कालच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जमले होते”, असे संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button