breaking-newsमहाराष्ट्र

बुलढाण्यात आजपासून 21 ऑगस्टपर्यंत ‘लॉकडाऊन’

बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 21 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत एक महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी मेडिकल दुकाने, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी मंगळवारी दिले आहेत.

सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर दुपारी 3 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत दूध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यू लागू असणार आहे. तसेच 1 जुलै 2020 च्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी दिनांक 31 जुलैपर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक मानवी कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, आंतर जिल्हा वाहतुक / पासधारक वाहने व माल वाहतुक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप 24 तास सुरू राहतील.

जिल्ह्यामध्ये संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसीडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक असणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी देण्याकरीता विविध कार्यालयांचे मदतीने पासेस देण्याची व्यवस्था करायची आहे. तसेच ज्या विभागाशी संबंधीत कामकाज असेल त्या विभागास पासेस देण्याची परवानगी असेल. शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन कामासाठी ओळखपत्रावर परिभ्रमणास मुभा असणार आहे. विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू देणार्‍या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button