breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे’, करुणा धनंजय मुंडे राजकारणात उतरणार!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या रेणू शर्मांनी आरोप केल्यानंतर त्यांच्या बहिण करूणा शर्मा देखील चर्चेत आल्या होत्या. स्वतः धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता करुणा शर्मा यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा शर्मा यांनी महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह व इतर प्रश्नांबाबत त्यांनी यावेळी महापौरांना माहिती दिली.

करुणा शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या की, मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्ष मी घरात होते. आता 2 ते 3 महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. पण करावं लागलं तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि अश्लील व्हिडीओबाबत त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस सुरु असल्याने बोलण्यास कोर्टाने मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी पुराव्यासह बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढणं पसंत केलं, असेही यावेळी करुणा शर्मा म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button