breaking-newsमनोरंजन

‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

‘जयडी’ च्या भूमिकेने घराघरांत पोहोचलेली ‘राजकन्या’ म्हणजेच किरण ढाणेनं स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात बनवलं आहे. ‘लागीरं झालं जी’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी किरण सध्या ‘राजकन्या’ या मालिकेतून आपल्याला रोजच भेटते. आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर एण्ट्री घेणार आहे. धोंडिबा़ बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित तसेच जगप्रसिद्ध “कान्स चित्रपट महोत्सव” मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे निवडण्यात आलेली ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटातून किरण एका ध्येयवेड्या अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे.

ग्रीन ट्री प्रोडक्शन प्रस्तुत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचं भविष्य अधोरेखित करतो. ‘पळशीची पीटी’ने आजपर्यंत अनेक दिग्गजांची मनं जिंकली असून आत्ता रसिक-मायबापांच्या पसंतीची पोचपावती मिळवण्यास सज्ज झाले आहेत.

kiran dhaneकिरण ढाणे

कधी खट्याळ… कधी भोळसट.. अज्यावर जीवापाड प्रेम करणारी जयडी एकतर्फी प्रेमातून खलनायिकाही बनते. किरणने साकारलेल्या या भूमिकेची वाहवा आजही होते. तर ‘राजकन्या’मधली समंजस किरण प्रत्येक आई-वडिलांची लाडकी झालीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किरणने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘पळशीची पीटी’ मधील भागीची भूमिका ही अधिक आव्हानात्मक आहे. माळरानात मेंढपाळ करणाऱ्या साधारण कुटुंबात जन्मलेली ही भागी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत राष्ट्रीय स्तरावर अॅथलेट बनण्याचा मान पटकावते. अनेक नामांकनं आणि पुरस्कार विजेत्या किरणला या व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ”येणारी प्रत्येक संधी मी आव्हान म्हणून स्वीकारते. अपेक्षांची उंची गाठायची असेल तर नवनवीन आव्हानं सुद्धा स्विकारता आली पाहिजे आणि ही ताकद मला माझ्या रोजच्या कामांतून मिळते,” असं ती म्हणते.

‘लागीरं झालं जी’ मध्ये शितलीच्या काकाच्या भूमिकेतील अभिनेते धोंडिबा बाळू कारंडे यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. आता त्यांचं दिग्दर्शन लोकांना आवडेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button