breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ‘सेवा सप्ताह’ साजरा करणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपाने १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केले आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांचा ७०वा वाढदिवस आहे. यासाठी भाजपाकडून विशेष तयारी केली जात आहे.

सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनीदेखील यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. पक्षाकडून देशभरातील सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांना सेवा सप्ताह दरम्यान कोणते कार्यक्रम घेतले जावे यासंदर्भात एक पत्रकदेखील पाठवण्यात आलेले आहे. भाजपा केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख व भाजपा सरचिटणीस अरुण सिंग यांनी हे पत्रक पाठवले आहे. यामध्ये सेवा सप्ताह अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची यादी व सामाजिक उपक्रमांसदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा यंदा ७०वा वाढदिवस असल्याने भाजपाकडून आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठीदेखील ‘सेव्हन्टी’ ही थीम ठरवण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये देशभरातील प्रत्येक मंडळातील पात्र ७० व्यक्तींना कृत्रिम हात-पाय व अन्य आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. ७० अंध व्यक्तींना चष्मे दिले जाणार आहेत. याशिवाय भाजपाचे नेते कोविडच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत ७० रुग्णालयांमध्ये व गरीब वस्तीत फळवाटपदेखील करणार आहेत.

तसेच पक्षाकडून नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्थानिक रुग्णालयांच्या गरजेनुसार ७० कोरोनाबाधितांसाठी प्लाझ्मा दानाचीदेखील व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. देशभरातील मोठ्या राज्यांमध्ये किमान ७० रक्तदान शिबिरे व छोट्या राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button