breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : पदाधिकारी, नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी आज मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केल्यानंतर मोबाईलद्वारे सेल्फी काढून सोशल माध्यमाद्वारे इतरांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी आणि त्यांच्या मुलीने मतदानाचा हक्क बजावला. विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी देखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. स्थयी समितीचे माजी सदस्य आणि अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, रहाटणीचे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते, कार्यकर्ते नरेश खुळे, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, भाजपचे नेते अमित गोरखे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button