breaking-newsताज्या घडामोडीपुणे

रामदास आठवले म्हणतात, मला राष्ट्रवादी काॅंग्रेसची ऑफर!

पुणे – आरपीआयला एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. युतीमध्ये योग्य वागणूक मिळणार नसेल तर मला, इतर पक्षांचे दरवाजे खुले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  यांनी मला निरोप पाठवला. अशी माहिती रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात झालेल्या युतीचे आरपीआयतर्फे स्वागतच आहे. आरपीआयला बाजूला करणे योग्य नाही. आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी, अशीही मागणी यांनी केली. आठवले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत म्हणून आरपीआयला बाजूला ठेवणे बरोबर नाही. आरपीआयने दक्षिण मुंबईतील जागा मागितली होती. मात्र शिवसेनेने ही जागा दिलेली नाही. शिवसेनाजागा देत नसेल तर भाजपाने ईशान्य मुंबईतील जागा आरपीआयला द्यावी. देशभर आणि महाराष्ट्रात आरपीआयमुळे भाजपा-सेनेला फायदा होत आहे. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांना नाराज करू नये. आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा तर विधानसभेसाठी आठ ते दहा जागा द्याव्यात. अशीही मागणी राहणार आहे, असेही आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button