breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी, समीर वानखेडे यांच्यावर CBI ची छापेमारी

मुंबई : बॉलीवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबीने अहवाल सुपूर्त केल्यानंतर ही सीबीआयने हा कारवाईचा बडगा उचलला आहे. वानखेडेंवर बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे. आर्यन खान प्रकरणात २५ कोटी रूपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत..’; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं विधान चर्चेत

सीबीआयकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतर काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यांच्या मुंबईतील घराच्या परिसराची यंत्रणेकडून झाडाझडती घेण्यात आली. वानखेडे यापूर्वी एनसीबीचे मुंबई झोनचे प्रमुख अधिकारी होते. आर्यन खान याला त्यांनी ड्रग्ज प्रकरणात क्रूज वरून अटक केली होती. यावेळी ते एनसीबीचे प्रमुख अधिकारी होते. न्यायालयातून आर्यन खानला जामीन मिळाला. आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेण्यात आला. याप्रकरणातून आर्यनची निर्दोष मुक्तताही करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button