breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नव्या संसद भवनात ठेवणार ऐतिहासिक सेंगोल, ‘सेंगोल’ म्हणजे काय?

दिल्ली : नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होणार आहे. यावेळी ऐतिहासिक राजदंडाचे पुनर्जिवन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक राजदंडाला सेंगोल असं म्हणतात. ज्याचा सर्वात आधी वापर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑगस्ट १०४७ साली केला होता, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

२८ मे रोजी नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या ६० हजार कामगारांनी योगदान दिलं आहे, त्यांचाही यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ऐतिहासिक परंपरेचे पुनर्जिवन होणार आहे. कारण, याच दिवशी पारंपारिक राजदंड असलेले सेंगोलही संसद भवानात कायमस्वरूपी लावण्यात येणार आहे. यामागे अनेक युगांची परंपरा असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.
सेंगोल काय आहे?

हेही वाचा – कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस येणार, WHO अध्यक्षांचा इशारा!

स्वातंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारण्यात आलं होतं की, सत्ता हस्तांतरणाबाबत या नियोजन आहे. त्यावेळी सत्ता हस्तांतरणाबाबत नेहरूांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. सी. गोपालाचीर यांनाही विचारलं. यातून सेंगोलच्या प्रक्रियेला चिन्हात केलं गेलं. पंडित नेहरू यांनी पवित्र सेंगोलला तमिळनाडूहून मागवलं होतं. त्यानंतर इंग्रजांकडून जो सेंगोल राजदंड स्वीकारून सत्ता स्थापन केली होती.

सेंगोल ज्यांना मिळतो त्यांना निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन करणे अभिप्रेत असतं. हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडून यावर धार्मिक क्रिया करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य काळात हा राजदंड नेहरूंकडे सोपवण्यात आला होता. १९४७ नंतर या राजदंडाचा विसर पडला होता. १९७१ मध्ये तामिळनाडूच्या विद्वांनांनी हा राडदंड पुन्हा चर्चेत आणला होता. तर २०२१-२२ मध्ये भारत सरकारने याविषयी माहिती केली होती. महत्वाचं म्हणजे १९४७ साली तमिळचे जे विद्वान उपस्थित होते ते २८ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमातही उपस्थित राहणार असल्याची महत्वपूर्ण माहिती अमित शाहांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button