breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची ‘विक्रमी’ भरारी

श्रीहरीकोटा : 130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्याचांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ‘बाहुबली’ रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button