जीबीएसचा धोका टाळण्यासाठी पाणी उकळून,अन्न पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला

पिंपरी : गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या नव्या गुंतागुंतीच्या आजारामुळे देशभर भीतीची लाट आहे. दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
पिंपरी चिंचवड शहरात या आजाराचे आतापर्यंत एकूण 26 रूग्ण आढळले आहेत. ‘जीबीएस’ची लागंण झालेल्या दोन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असला, तर त्या रुग्णांचे अन्य आजारदेखील बळावले होते, असे महापालिका प्रशासनानचे म्हणणे आहे. जीबीएसच्या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, दहा आरओ प्लांट तर सात वॉटर एटीएमवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – जिल्ह्यातील पर्यटनस्थळे एकाच नकाशावर यावीत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना
आता उन्हाळा येत असून लग्नसराईत दूषित पाणी व दूषित अन्नाची समस्या उद्भवू शकते. दूषित पाणी व शिळे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून तर अन्न पूर्णपणे शिजवून खावे, असा सल्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्षण गोफणे यांनी दिला आहे.
मुळातच हा आजार नवा नाही. तसेच संसर्गजन्य नाही. ऋतु बदलात नवे सर्दी तापीचे रुग्ण वाढले की त्यातील एखाद्याला जीबीएस होतो. मी वीस वर्षात शेकडो जीबीएसचे रुग्ण पाहीले आहेत. ते अगदी बरे होतात. कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. लक्षणे पाहीली की लगेच उपचार करावेत. आयव्हीआयजी इंजेक्शन, प्लाझमा एक्स्चेंज हे उपाय असले तरी थोडे खार्चिक आहेत. त्यासाठी दुखणे अंगावर काढू नका,असे आवाहन करण्यात आले आहे.