रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाल्यास पचनसंस्थेस ताण
निरोगी आरोग्यासाठी चांगला आणि निरोगी नाश्ता करणे खूप महत्वाचे

मुंबई : अनेक लोकांना सकाळी नाश्ता करण्यापूर्वी खूप जड अन्न खाण्याची किंवा आरोग्यासाठी हानिकारक असे काहीतरी खाण्याची सवय असते. निरोगी आरोग्यासाठी चांगला आणि निरोगी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. बरेच जण सकाळी उठल्याबरोबर चहा पितात आणि काही फळे खातात, या 2 गोष्टी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊया. तसेच रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याची हानी होते हे देखील समजून घेऊया.
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी छोले भटुरे देखील खाणे टाळावे. आधी व्यायाम करा आणि नंतर पदार्थांचे सेवन करावे. दुसरीकडे जर तुम्हालाअॅसिडिटिची समस्या असेल तर अशा दोन गोष्टी आहेत, ज्या सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
मसालेदार पदार्थ
अनेक लोक सुट्टीच्या दिवशी छोले-भटुरे सारखे मसालेदार पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करतात. असं केल्यानं छातीत जळजळ होऊ शकतं आणि दिवसभर आपल्याला जड वाटू शकतं. सकाळी पोटभर नाश्ता केला पाहिजे पण कमी मसालेदार आणि पौष्टिकतेने भरलेले पदार्थ खावे.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय?’ विधीमंडळातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले
थंड पदार्थ
सध्या काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी ऊन असे वातावरण आहे. जर तुम्ही रात्रभर तहान लागल्यावर सकाळी थंड पाणी प्यायले तर पोटात पेटके येऊ शकतात. यासोबतच, लूज मोशन, स्लो पचन प्रक्रिया इत्यादी समस्या देखील उद्भवू शकतात. तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे जेणेकरून पचनसंस्था आणि तुमचे आतडे निरोगी राहतील.
पुढील गोष्टी ठेवा लक्षात
सकाळी रिकाम्या पोटी खाण्याबद्दल डॉक्टर म्हणाले की, ‘फक्त अशाच गोष्टी टाळा ज्या सर्वसाधारणपणे चांगल्या नसतात, जसे की कार्बोनेटेड पेये किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज, जास्त द्रवयुक्त साखरेचे प्रमाण असलेले अन्न इ. तुम्ही हे कोणत्याही वेळी घेतले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत.’
नाश्ता कधी करावा?
डॉक्टरांनी सांगितले की सामान्यतः व्यायामानंतर नाश्ता करण्याची शिफारस केली जाते आणि त्या वेळी व्यक्ती कोणताही भारतीय नाश्ता खाऊ शकत नाही. तुम्हाला फक्त कॅलरीज मोजण्याची गरज आहे. म्हणून तुमच्या जेवणातील कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करा आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.





