Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्‍लीपाठोपाठ बंगळुरूतील शाळांना बॉम्‍बच्‍या धमक्‍या.! विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली

नवी दिल्‍ली : देशाची राजधानी नवी दिल्‍लीपाठोपाठ बंगळुरूतील तब्‍बल ९० शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धक्‍कादायक प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्‍ये घबराट पसरली आहे. या आठवड्यात नवी दिल्‍लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे लक्ष्य बनवण्याचा हा चौथा दिवस आहे.

दिल्लीतील जवळपास ५० शाळांसह ३ महाविद्यालयांना शुक्रवारी सकाळी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये सिव्हिल लाईन्समधील सेंट झेवियर्स, पश्चिम विहारमधील रिचमंड ग्लोबल स्कूल, रोहिणीमधील अभिनव पब्लिक स्कूल आणि रोहिणीमधील द सॉवरेन स्कूल यांचा समावेश आहे. राजधानीतल्या शाळांना अशा धमक्या देण्याचा हा सलग चौथा दिवस आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील ४५ हून अधिक शाळा आणि तीन महाविद्यालयांना शुक्रवारी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या तीन महाविद्यालयांमध्ये उत्तर दिल्लीतील इंद्रप्रस्थ (आयपी) महिला महाविद्यालय, हिंदू महाविद्यालय आणि श्री राम महाविद्यालय (एसआरसीसी) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – शिवशक्ती भिमशक्तीचा पिंपरीमध्ये आनंदोत्सव!

यापूर्वी, दिल्‍लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. यानंतर संबंधीत ठिकाणी तातडीने बॉम्ब निकामी करणारे आणि श्वान पथके आणि अग्निशमन विभागासह पोलीस तपासणीसाठी दाखल झाले. या ठिकाणी तपासणी केली असता कोणतीही संशयास्‍पद वस्‍तू आढळली नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

दिल्‍लीपाठोपाठ शुक्रवारी बंगळुरूमधील राजराजेश्वरी नगर आणि केंगेरीसह विविध भागातील खासगी शाळांना असेच धमकीचे ई-मेल आहे. याची दखल घेत बंगळुरू शहर पोलिसांनी अलर्टसाठी शाळांमध्ये अनेक पथके तैनात केली आहेत. शाळेत बॉम्ब असे शीर्षक असलेला ई-मेल [email protected] वरून अनेक संस्थांना पाठवण्यात आला होता.

दरम्‍यान, आठवड्याभरात देशभरातील १००हून अधिक शाळांना धमकीचे संदेश आले आहेत. त्यापैकी ६० शाळा या दिल्लीतील होत्या. या धमक्या नंतर खोट्या असल्याचे सांगण्यात आले. ते एन्क्रिप्टेड नेटवर्क आणि व्हीपीएनवरून पाठवण्यात आले होते. त्यामुळे ट्रॅक करणे कठीण झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button