Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोरोना इतक्या लवकर जाणार नाही, आम्हाला लहान मुलांची चिंता – जागतिक आरोग्य संघटना(WHO)

करोना महामारी इतक्या लवकर संपणार नसून अद्यापही आरोग्य सेवा विस्कळीत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. खासकरुन गरीब देशांमध्ये लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण सुविधा उपलब्ध नसल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकीकडे श्रीमंत देशांमधील करोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होत असताना आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियामधील काही देशांमध्ये अद्यापही संख्या वाढत असल्यावरुनही चिंता व्यक्त केली आहे.
“आपल्याला अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. खूप काम करायचं आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटलं आहे. जर आपण योग्य पावलं उचलली तर करोनची दुसरी लाट रोखू शकतो असा विश्वास टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे.





