आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हेल्दी डाएटचा समावेश

कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण तुमच्या हृदयासाठी धोकादायक

महाराष्ट्र : खराब कोलेस्ट्रॉलला कोलो-डेन्सिटी लिपोप्रोटीन ( एलडीएल ) देखील म्हणतात. तुमच्या शरीरात एक प्रकारचे कोलेस्टेरॉल असते, जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते. त्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हृदयविकार वाढण्याचा धोका सर्वाधिक निर्माण होतो. खराब कोलेस्ट्रॉल यकृतात तयार होते आणि नंतर रक्तात विरघळण्यासाठी लिपोप्रोटीनशी बांधले जाते.

न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल सांगतात की, जर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन प्लेग तयार करते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. हे प्लेग रक्त प्रवाह कमी करू शकते, ज्यामुळे हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही स्वस्त फळांचा आहारात समावेश करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी तुम्ही देखील तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवा.

सफरचंदाचे सेवन करा
खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सफरचंद अतिशय प्रभावी फळ आहे. सफरचंदात विरघळणारे फायबर आणि पेक्टिन असते, जे कोलेस्टेरॉलला रक्तातून बाहेर काढण्यास मदत करते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी योग्य राहते.

अननसाचे सेवन करा
अननसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते. यामुळे नसांमध्ये अडकलेले खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत होते. यासोबतच शरीराच्या आतील भागाचीही स्वच्छता करते. ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

संत्रे आणि लिंबू सेवन करा
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे संत्रा, लिंबू, आणि हंगामी फळांचा आहारात समावेश अवश्य करावा. दररोज एक संत्री किंवा हंगामी फळे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.

द्राक्षाचे सेवन करा
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यात रेझवेराट्रॉल नावाचा घटक असतो, जो हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो. नियमित द्राक्षे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.

खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात हेल्दी डाएटचा समावेश करा. बाहेर तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा. यासोबतच दररोज व्यायाम करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button