ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मुंबई-बेंगलोर हायवेवर नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्याला हींजवडी पोलिसांनी घातल्या बेड्या

मुख्य आरोपी सह दोन अल्पवयीन मुले ताब्यांत

पिंपरी : मुंबई-बेंगलोर महामार्गावर नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळी कडून हिंजवडी पोलिसांन बळजबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

रामदास बबन कचरे असं या टोळीच्या मोहरक्याच नाव आहे. रामदास बबन कचरे हा आपल्या दोन अल्पवयीन साथी दारांसोबत महामार्गावर लोकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचं मुल्यवान सामान बळजबरीपूर्वक चोरी करत असल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे.

या प्रकरणात तांत्रिक तपास करून हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये रामदास बबन कचरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदार विरोधात भादवि कलम ३९४, ३४ आणि मुंबई पोलीस कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चार दुचाकी, दोन मोबाईल फोन, एक सोन्याची चैन, एक लोखंडी कोयता असा एकूण एक लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button