breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

धक्कादायक! कामगाराच्या अंगावर वीज कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. चंद्रपूल जिल्ह्यात वेकोलीच्या माजरी क्षेत्रातही नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतूक करणाऱ्या बाबू धनकुमार महेंद्र सिंह या कर्मचाऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. ही संपुर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अचानक वादळ सुरू झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. तो चालत असताना त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कर्मचारी मुळचा बिहार राज्यातील आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळी गाठले. मृत बाबू धनकुमार महेंद्र सिंह हा माजरी खाणीतील के. जी. सिंग कंपनीत कर्मचारी होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button