breaking-newsमहाराष्ट्र

मुंबई- गोवा महामार्गावर ‘शिवशाही’चा अपघात; सहा जखमी

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी मुंबई- गोवा महामार्गावर शिवशाहीचा अपघात झाला असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहे. ही बस दापोलीवरुन मुंबईच्या दिशेने येत होती.

मुंबई- गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील गडब गावाजवळ शिवशाही बसचा आणि मिनी डोअर रिक्षेचा अपघात झाला. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर नियंत्रण सुटलेली बस पलटली. अपघातात बसमधील चार तर रिक्षेतील दोन प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

का होतात शिवशाहीचे अपघात?

वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सेवेपेक्षा अपघात, चालकांची वागणूक, बेदरकारपणे वाहन चालविणे इत्यादींमुळेच अधिक चर्चेत असते. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनाची पुढील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. या बदलामुळे महामंडळाच्या चालकांना बस चालविताना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button