breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन महापालिका : वंचित बहुजन आघाडीची मोर्चेबांधणी, शहर कार्यकारिणी जाहीर

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे, कार्याध्यक्षपदी सुहास देशमुख

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शहराची कार्यकारिणी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, कार्याध्यक्ष म्हणून सुहास देशमुख यांना जबाबदारी सोपवण्यात आहे.

पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी अंतर्गत प्रत्येक वॉर्डातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येणार असून, त्याद्वारे पक्षविस्तार करण्याची तयारी आहे. संपूर्ण शहरात प्रत्येक स्तरावर समिती नेमण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष : सुहास देशमुख, उपाध्यक्ष : आकाश सुपारे, प्रकाश घोडके, सुनील गायकवाड, महासचिव : रहिमभाई सय्यद, सचिव : नरेंद्र राउत, प्रवक्ते : क. डी. वाघमारे, कोशाध्यक्ष  : राजेश बारसागडे, संघटक : सदानंद माने, अजित चौगुले, बाबुराव फुलमाळी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button