breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा कमबॅक; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पावसाळा कोणाला आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल. मात्र पावसाने यंदा मनसोक्त भिजण्याची संधीही कोणाला दिली नाही. यंदा इतका नगण्य पाऊस झालाय की छत्री आणि रेनकोटचा वापर नाहींच्या बरोबरच झालाय. कारण जुलैच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्टचा संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रापासून दूर राहिला. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांवर काळ्या ढगांचे सावट आहे. त्यामुळे पाऊस परतणार हे नक्की.

हेही वाचा – ‘विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत’; ठाकरे गटातील नेत्याची राहुल नार्वेकरांवर टीका 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य प्रदेशावर आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हेवगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button