breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Heavy Rain: मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा

मुंबई: गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागाड मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

त्यामुळे मुंबईकरांनी आज घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज नक्की घ्या आणि शक्य असल्यास आज प्रवास टाळावा. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button