breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पिंपरी-चिंचवड’करांना दररोजच्या पाण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार

महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची माहिती

‘पवना जलवाहिनी’ प्रकल्पांची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण दोनवेळा शंभर टक्के भरले आहे. पण महापालिकेकडून शहरवासियांची तहान एक दिवसाआड भागविली जात आहे. मागील दीड वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. परंतू, जोपर्यंत 50 एमएलडी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होत नाही. तोपर्यंत नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा कायम राहणार आहे. दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी शहरवासियांना आणखी एक वर्ष तरी वाट पाहावी लागेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हर्डिकर म्हणाले की, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी पुरवठ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येत आहेत. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पांच्या कामांना गती देवून सर्व कामे तातडीने पुर्ण करण्यात येत आहे. या योजनेतून वर्षभरात अतिरिक्त शंभर एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्वकांशी आहे. या प्रकल्पावरील स्थगिती उठवण्यासाठी आमचा राज्यस्तरावर पाठपुरावा सुरु आहेत. त्यामुळे पवना जलवाहिनी प्रकल्पांचा प्रशासकीय पातळीवरील आराखडा तयार करण्यात येत आहे. पवना धरणात शहराला केवळ 425 एमएलडी पाणी कोटा राखीव आहे. पण शहरवासियांची तहान भागवण्यासाठी 480 एमएलडी पर्यंत अतिरिक्त पाणी साठा उचलला जात आहे. परंतू, पवना जलवाहिनीमुळे पाणी गळती रोखण्यात यश येईल. शिवाय 30 टक्के पाणी बचत होईल. तसेच शहराला पाणी कमी पडू लागल्यास आपण आणखी 600 एमएलडी पर्यंत अतिरिक्त पाणी उचलले जाणार आहे.

शहरात अमृत योजनेंतून चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात शहरातील पहिल्या टप्प्यात 40 टक्के आणि दुस-या टप्प्यांत 60 टक्के काम करण्यात येत आहे. त्या दोन्ही टप्प्यांतील सुमारे 80 टक्के काम पुर्ण झाले आहे. तसेच उर्वरीत काम येत्या डिसेंबरअखेर पुर्ण होतील.

शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. तसेच शहरातील अनधिकृत नळ तोडणी मोहीम हाती घेण्यात आलीय. त्यानूसार पाणी पुरवठा विभागाकडून अनधिकृत नळ जोडणीधारकांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय रावेत पंपींग स्टेशनला पाणी उचलण्याची क्षमता वाढवण्याबाबत काम अंतिम टप्प्यात आले. हे काम नोव्हेंबरपर्यंत पुर्ण होईल. असेही हर्डिकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button