पिंपरी / चिंचवड

इलेक्ट्रिक दुकानात चोरी करून सीसीटीव्ही कॅमेरा फोडला, डीव्हीआर पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

निगडी-तळवडे  रोडवर काजल इलेक्ट्रिक नावाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दुकानातील साहित्य चोरल्या नंतर चोरट्यांनी दुकानात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आणि कॅमे-याचा डीव्हीआर पळवून नेला. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.

शरद सखाराम जिभकाटे (वय 46, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे निगडी-तळवडे रोडवर काजल इलेक्ट्रिक हे दुकान आहे. रविवारी (दि. 3) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 4) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे दुकान फोडले. दुकानातून रोख रक्कम, पाण्याच्या पाच मोटार तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर असा एकूण 63 हजार रुपयांचा माल चोरून नेला. आरोपींनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्याचे नुकसान केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button