breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

संत नगर मोशी प्राधिकरण येथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका प्रस्थापित

पिंपरी: मोशी संतनगर येथील नागरिकांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे केले स्वागत संत नगर मोशी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात महाराजांच्या पादुका कायमस्वरूपी मंदिरात ठेवण्यात आल्या.

संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात पादुका प्रस्थापित करण्यात आल्या
संत नगर येथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज येथील पादुका प्राधिकरण सेक्टर 4 स्वामी समर्थ मंदिरात ठेवण्यात आल्या यावेळी संत नगर मधील नागरिक बंधू आणि भगिनी तसेच भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत नगर या भागामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मंदिर झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या भागामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर नावलौकिक आहे तसेच आज स्वामी समाधी स्थळातील या पादुका म्हणजेच साक्षात स्वामी या पादुकांच्या रूपामध्ये या मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत त्यामुळे नागरिकांना अक्कलकोट येथे जाता नाही आले तरी या ठिकाणीच स्वामींचे दर्शन होणार आहे.

या पादुका अक्कलकोट ते पिंपरी चिंचवड संत नगर मोशी असा प्रवास आल्यानंतर या परिसरातील नागरिक स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अतिशय उत्साहात मंदिर परिसरात गर्दी केली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच नेते मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते पादुकांची पूजा झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button