Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

तुम्ही हे कासव कधी पाहिले आहे का?; ठाणेकरांनी वाचवला जीवया दुर्मिळ कासवाचा

ठाणे | ठाण्यातील खोपट परिसरातील ब्रह्माळा तलावात सोमवारी एक कासव तरंगत असल्याचे आढळले. ही माहिती मिळताच ठाण्यातील वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन आणि वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या कासवाला पाण्यात पोहण्यास अडथळा येत असल्याचे लक्षात आल्याने बचाव पथकांनी त्याला पकडून वनविभागाच्या समन्वयाने पशुवैद्यकाद्वारे उपचार सुरू केले आहेत.

ठाण्यातील तलावांमध्ये कासवांच्या निरनिराळ्या प्रजाती आढळून येत असून त्यांचा मुक्त विहार तलावांमध्ये सातत्याने असतो. परंतु सोमवारी ब्रह्माळा तलावामध्ये कासव तरंगत असून त्याची हालचाल मंदावल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी वाईल्ड लाइफ वेल्फेअर संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून कासवाला मंदत करण्याची विनंती केली. यावर संस्थेचे स्वयंसेवकांनी घटनास्थळी पोहचून या कासवाचे निरिक्षण केले असता कासवाला पाण्यात शिरता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन वनविभागाशी समन्वस साधून पशुवैद्यक डॉ. चारियार्स यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

कासवावर बाह्य जखमा दिसत नसल्या तरी एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या फुफुसात संसर्ग झाल्यामुळे त्याला निट श्वास घेता येत नसल्याचे आढळून आले. २० किलो वजनाचा तीन फूट लांबीचा हा दहा ते बारा वर्षे वयाचा कासव असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्यावर आवश्यक ते उपचार सुरू करण्यात आले आहे.

संरक्षित प्रजातींच्या यादीत समाविष्ट

हे कासव गोड्या पाण्यात आढळणारे अत्यंत दुर्मिळ प्रजातीमधील कासव आहे. त्याचे शास्त्रीय नाव लीथ सॉफ्टशेल्स असून त्याला मराठीत मृदूपाठीचा कासव असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय युनियन फॉर कन्झव्हर्शन ऑफ नेचर यांनी हा धोकादायक प्रजातीमध्ये नोंदवला आहे. भारती वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याल संरक्षित करण्यात आले आहे. चेंबुर येथील डॉ. दीपा कात्याल आणि डॉ. जया चारियार यांच्याकडून त्यावर उपचार सुरू आहे.

कासवावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची योग्य अदिवासामध्ये सोडण्याची व्यवस्था संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे संस्थेचे आदित्या पाटील यांनी स्पष्ट केले. मयूर दळवी, श्र्लोक सिंग, आशिष साळुंखे, ओंकार सुवारे, अथर्व कुलकर्णी यांनी या कासवाच्या बचाव मोहिमेत महत्वाची भूमिका निभावली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button