breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा रविवारपासून!

पिंपरी: चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती पालखीची भाद्रपद यात्रा रविवारपासून (दि.२८) सुरू होत आहे. तर ०६ सप्टेंबर रोजी यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.

रविवारी (दि.२८) पालखी प्रस्थानाच्या निमित्त मिरवणूक काढण्यात येईल. त्यात अश्व, पुण्यातील श्रीगजलक्ष्मी ढोल पथक असेल. दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान करेल. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, पुण्यातील वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. सोमवारी (दि.२९) पहाटे साडेचार वाजता पालखी पुण्यातून मोरगावकडे मार्गस्थ होईल. भवानीपेठ, रामोशी गेट, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात पालखी मुक्काम असेल.

तेथून मंगळवारी (दि.३०) सकाळी पालखी निघेल. शिवरी, रासकर मळा, जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. बुधवार (दि.३१) आणि गुरुवारी (दि.०१ सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगावतच असेल. शुक्रवारी दि.०२ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. जेजुरी, कऱ्हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम वडकी असे मुक्काम करत पालखी ०६ सप्टेंबर रोजी चिंचवड येथील मंदिरात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button