breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार

ऋषभ पंत, केएल राहुलचा भारतीय संघातुन पत्ता कट

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही फॉरमॅटमधील संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याकडे मोठी जबाबदारी सोपावली आहे. त्याचवेळी सतत फॉर्मशी झगडणाऱ्या केएल राहुल आणि ऋषभ पंतला मोठा धक्का दिला आहे.
३ जानेवारीपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. तर १० जानेवारीपासून वनडे मालिका खेळणार आहे. यापुर्वीच्या बांगलादेश दौऱ्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला दोन सामन्यांतु विश्रांती दिली होती. यामुळे रोहित टी-२० मालिकेत भाग घेणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपावले आहे. तर रोहित शर्माकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपावले आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक व फलंदाज ऋषभ पंतला श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यापासून पंत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरला आहे. बाग्लादेशविरूद्ध सलामीवीर म्हणून त्याला संधी देण्यात आली होती, पण त्याच्याकडून फारशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. आता त्याला एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही संघातून वगळण्यात आले आहे.
श्रीलंकेविरूद्ध टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
श्रीलंकेविरूद्ध वनडे सीरीजसाठी भारतीय इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button