breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

मी स्वप्नातही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल’- संजय राऊत

महाईन्यूज | नवी दिल्ली

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे. सध्या दिल्लीत संसदेच्या अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत आहेत. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षावर मनसोक्त मन मोकळे केले.यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता, आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच सुरु होतं. पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती.

या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच (शिवसेनेचाच) होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली व हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता असं त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button