breaking-newsपुणे

पुण्यातील बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री;पाच जणांना कोरोना

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या रेडलाईट एरियामध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिला, तर तीन पुरुषांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचे नियोजन, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापर्यंत पुणे शहरातील रेड लाइट एरियात ‘कोविड19’चा संसर्ग झाला नव्हता. गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय परिसरात असलेल्या दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना चाचणी शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. काळजीची बाब म्हणजे पॉझिटिव्ह महिलांमध्ये चार महिन्यांच्या गर्भवतीचाही समावेश आहे.

दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करतात, तर पुरुष त्याच भागातील फेरीवाले असल्याची माहिती आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर इथल्या महिलांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटला होता. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने रेड लाईट एरिया पुन्हा सील होण्याची भीती महिलांना सतावत आहे.

गेले चार महिने पुण्यालाही कोरोनाने विळखा घातला आहे. मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अशाही परिस्थितीत बुधवार पेठेत कोरोनाचा शिरकाव न झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते. परंतु इथल्या सेक्स वर्कर महिलांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

काही सेवाभावी संस्थांच्या वतीने सेक्स वर्कर महिलांना अन्नधान्य दिले जात आहे. परंतु लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आम्हाला महिन्याला 3 ते 5 हजार मासिक भत्ता देण्याची मागणी या महिलांनी केली आहे. यासंदर्भात काही एनजीओच्या माध्यमातून गेल्या महिन्यात पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button