breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुशिक्षीत तरुणांसाठी नवी सांगवीत करिअर महोत्सव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जागतिक युवा दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 11) करिअर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी पाच या दरम्यान महोत्सव होणार आहे. या महोत्सवात बेरोजगार तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपातर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगारांना या महोत्सवातून नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

फॉरेन लँग्वेज, फाईन आर्ट, संरक्षण विभागाशी संबंधित संधी, एअर फोर्स, डिझाईनिंग, वैद्यकीय क्षेत्र, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, टुर्स अँड ट्रव्हल्स, चित्रपट निर्मिती आणि अभिनय, बँकिंग, फॅशन, ज्वेलरी डिझायनिंग, क्रीडा, कृषी क्षेत्र, पत्रकारिता, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट, ॲव्हिएशन, मर्चंट नेव्ही, इव्हेंट मॅनेजमेंट, सीए, सीएस, बीएसस्सी, बीबीए, एमबीए, लॉ, युपीएससी, एमपीएससी, नर्सिंग, इंडियन नेव्ही, पॅरा मेडिकल, फोटोग्राफी, फिजिओथेरपी, कम्प्यूटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, नृत्य आणि संगीत क्षेत्रातील संधी या महोत्सवातून उपलब्ध होणार आहेत. तसेच या संधींबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांनी या करिअर महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button