पिंपरी / चिंचवड

सोशल मीडियावर अश्लील फोटो बनवून पाठवत महिलेचा विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी

सुरुवातीला महिलेचा चेहरा असलेला अश्लील फोटो आणि त्यानंतर महिला आणि तिच्या मुलाचा चेहरा  महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून महिलेचा विनयभंग केला. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे बुधवारी (दि. 19) दुपारी घडली.

याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7061836569 आणि 9341756515 या मोबाइल वरील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी या घरी होत्या. त्यावेळी आरोपीने त्याच्या मोबाइल नंबर वरून फिर्यादी यांच्या मोबाइलवर व्हाट्सअप कॉल केला. ‘तुम्हारे हजबंड कहा पे है’, असे फिर्यादी यांना विचारले. त्यावर महिलेने तुमचे ‘काय काम आहे’, अशी विचारणा केली असता आरोपीने तुमचे पती परत आल्यावर कॉल करण्यास पिडित महिलेला सांगितले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा चेहरा असलेले अश्लील फोटो फिर्यादी यांच्या मोबाईलवर पाठविले. यामुळे फिर्यादी यांनी आरोपीचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर आरोपीने साधा कॉल केला असता महिलेने तो उचलला नाही. यामुळे महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला येत असताना आरोपीने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून महिलेला त्यांचा व त्यांच्या मुलाचा चेहरा असलेले अश्लील फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button