breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार? पुतिन ‘ही’ भूमिका घेण्याच्या तयारीत

Russia Ukraine War News : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास दोन वर्षे होऊन गेली आहेत. दोन वर्षांपासून युक्रेनच्या भूमीवर रशिया सातत्याने हल्ले करत आहे. दुसरीकडे युक्रेनदेखील रशिया जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. या युद्धामुळे पाश्चिमात्य देश वेळोवेळी रशियावर निर्बंधांचा भडिमार करत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे लाखो युक्रेनियन लोक विस्थापित झाले आहेत. तसेच रशिया-युक्रेन युद्धाने मोठी आर्थिक अनिश्चितताही निर्माण झाली. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसला.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अशा अनेक गोष्टी घडल्या. मात्र, यानंतर आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनबरोबरचे युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे वृत्त समोर येत आहे. व्लादिमीर पुतिन हे युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध थांबवण्यास तयार आहेत. सध्याच्या बदलत्या गोष्टी ओळखून युद्धविराम देण्यास व्लादिमीर पुतिन तयार आहेत, असे वृत्त रशियन सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे.

हेही वाचा   –  ‘१९७१ मध्ये पंतप्रधान असतो तर..’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

या वृत्तामध्ये असेही म्हटले आहे की, युद्धबंदीनंतर युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर ते शक्य आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या तीन लोकांनी या संदर्भात सांगितंल की, अनुभवी रशियन नेत्याने सल्लागारांच्या एका लहान गटाकडे निराशा व्यक्त केली होती. युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांच्य़ाशी चर्चा विस्कळीत करण्यात पाश्चात्य देशांचा हात आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतिन हे युद्ध जोपर्यंत त्यांना हवे आहे तोपर्यंत लढू शकतात. मात्र, आता त्यांना ते युद्ध लांबवायचे नाही.

व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी यासंदर्भातील विषयावर बोलताना सांगितलं की, क्रेमलिनच्या प्रमुखांनी वारंवार स्पष्ट केलं आहे की, रशिया आपले लक्ष साध्य करण्यासाठी वाटाघाटीसाठी तयार आहे. ते म्हणाले की, देशाला शाश्वत युद्ध नको आहे. मात्र, युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने यावर उत्तरे दिली नाहीत. दरम्यान, रशियाने गेल्या काही आठवड्यांत युक्रेनच्या भागात वर्चस्व राखले आहे. मात्र, रशियाला आता युद्ध लांबवायचे नाही.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास दोन वर्षे झाले आहेत. त्यामुळे याचा फटका अनेक देशाच्या अर्थ व्यवस्थेला बसला आहे. युक्रेन-रशिया युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपातील पहिले मोठे युद्ध असल्याचे म्हटले गेले. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे हजारो लोक मारले गेले. या काळात पाश्चिमात्य देशांकडून रशियन अर्थव्यवस्थेवर व्यापक निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे पुतिन यांना हे समजले आहे की कोणत्याही नवीन प्रगतीसाठी आणखी एक देशव्यापी एकत्रीकरण आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आता युद्ध नको आहे. तसेच ते युद्धबंदीचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button