breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे ‘सीसीटीव्ही’ दोन वर्षात नादुरुस्त, विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राथमिक शाळांमध्ये तीनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र, दीड वर्षातच सर्व कॅमे-याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे ठेकेदाराने बसलेल्या कॅमेरे निकृष्ट दर्जाचे होते का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. त्या ठेकेदाराचे महापालिकेने बील अदा करुनही त्याना देखभाल दुरुस्त केलेले नाही. सीसीटीव्ही बसविणा-या ठेकेदारावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी केली आहे. दरम्यान, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसात खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरु आहेत. या विकृत घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. यापुर्वी प्राथमिक विभागात 87 शाळा असून जवळपास 350 हून अधिक कॅमेरे मागील वर्षी बसविण्यात आले होते. मात्र, शाळांमधील सर्वच कॅमेऱ्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. चांगल्या दर्जाचे कॅमेरे कमीत-कमी चार ते पाच वर्ष टिकतात. मात्र, मागील वर्षी बसविलेले कॅमेरे यंदा बंद पडल्याने त्यांची गुणवत्ता कशा पध्दतीची होती याची कल्पना येत आहे.

महापालिकेच्या शाळा परिसरात सतत विकृत घटना घडत आहेत. त्या घटना रोखण्यासाठी शहरातील शाळांमध्ये किमान तीन ते चार कॅमेरे आवश्‍यक आहेत. मात्र, काही शाळांमध्ये कॅमेरे केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नाबाबत महापालिकेने कोणतीही तडजोड न करता लवकरात-लवकर नादुरुस्त कॅमेरे नव्याने बसवावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

प्राथमिक विभागातील शाळा : 87
माध्यमिक विभाग : 18
उर्दू माध्यम : 14
हिंदी माध्यम : 2
इंग्रजी माध्यम : 2
एकूण शाळा : 123
विद्यार्थ्यांची एकूण संख्या : 37,851

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button