ताज्या घडामोडीपुणे

कट्टर प्रतिस्पर्धी ते खुल्या मनाचे राजकारणी, अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे | शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन वेळा पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व केलं. शिवसैनिक आणि सेना नेत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी फेसबुक पोस्ट केली आहे. कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिवाजीराव आढळराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!, अशी फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका सुरु असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी अमोल कोल्हे यांनी फोनवरुन चर्चा देखील केली होती.

शिवाजीराव आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. २००९ आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी १५ वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.

शिवाजीराव आढळराव संसदेत असतील : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेली राऊत यांनी आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आढळराव पाटील यांचं शिवसेनेसाठीचं योगदान अधोरेखित केलं होतं. शिरुर लोकसभेच्या जागेसाठी आम्ही एकत्रित बसणार आहोत. पण एवढं नक्की सांगतो, भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील, असं राऊत म्हणाले होते.२०२४ च्या लोकसभा निवडणुकांना आता दोन वर्षांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. येत्या दोन वर्षांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तिढा कसा सोडवणार हे पाहावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button