breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका’ – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बारामती –  कार्यकर्त्यांनी मला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. कारण, पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण अधिक होतं आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झालीय, असंही ते सांगायला विसरले नाहीत.

बारामतीच्या पणदरे येथील उत्कर्ष लॉन्सचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले की, या उल्लेखामुळे मित्र पक्षातले कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळेच पाडापाडी होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत कसं मिळेल याकडे लक्ष द्यावं असंही आवाहन त्यांनी केलं.

तसेच निवेदिता मानेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत पवार म्हणाले की, आघाडीकडून खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीच्या शक्यतेमुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यांना खासदारकी हवी होती, परंतू, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनतेच्या प्रश्नांवर सरकार थातूर मातूर उत्तरं देतंय. मात्र,पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपची पिछेहाट झालीय. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचीही टीका अजित पवार यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button