breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

गुजरातच्या तरूणाचे राज ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन!

अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी अनधिकृत मशिदी, दर्गांच्या बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अनधिकृत मशिदी, दर्गांच्या बांधकामाविरोधात कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना दिला. दरम्यान, गुजरातमधील एका तरूणाने राज ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

लिंकन सोखडिया नावाच्या तरूणाने एक ट्वीट केलं आहे. त्याने राज ठाकरे यांना मदतीचे आवाहन केलं आहे. आदरणीय राज ठाकरे जी, हाच ‘अहमदाबाद’चा चांडोळा तलाव, जो आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे आणि हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे.

येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. आणि इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक ट्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल, असं त्याने पत्रात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button