breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविडचा फटका; सहा महिन्यांत महापालिका उत्पन्नात 237 कोटींची घट

पिंपरी |महाईन्यूज|

करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गतवर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांमध्ये महापालिकेचे उत्पन्न 237 कोटी 37 लाख रुपयांनी घटले आहे. महापालिकेला आत्तापर्यंत 1 हजार 289 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत सहा महिन्यांमध्ये किमान 50 टक्के उत्पन्न अपेक्षित असताना 29.47 टक्केच उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे 20 टक्‍क्‍यांनी हे उत्पन्न कमी झाले आहे.

महापालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 5 हजार 232 कोटी 56 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 289 कोटी 33 लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले. गतवर्षी याच कालावधीत महापालिकेला 1 हजार 526 कोटी 70 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 237 कोटी 37 लाख रुपयांची घट उत्पन्नात झाली आहे.

महापालिकेला चालू आर्थिक वर्षात 861 कोटी 83 लाख रुपयांची आरंभीची शिल्लक वगळता 4 हजार 373 कोटी 73 लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे. सहा महिन्यांमध्ये 50 टक्के उत्पन्न अपेक्षित धरले तरी त्या तुलनेत जवळपास 20 टक्‍क्‍यांनी उत्पन्न कमी मिळाले आहे. करोनाचा परिणाम महापालिकेला विविध माध्यमांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे.

बांधकाम परवानगीच्या उत्पन्नात सर्वाधिक घट
महापालिकेला बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नात सर्वाधिक घट झाली आहे. गतवर्षी बांधकाम परवानगीच्या माध्यमातून महापालिकेला 331 कोटी 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र हे उत्पन्न सहापट घटले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये केवळ 53 कोटी 85 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे.

पाणीपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने घट झाली आहे. गतवर्षी पाणीपट्टीतून 21 कोटी 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर, यंदा फक्त 11 कोटी 45 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकराच्या उत्पन्नात निम्म्याने घट आहे. गतवर्षी मिळकतकरातून 290 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम महापालिका तिजोरीत जमा झाली होती. यंदा मात्र त्या तुलनेत 61 टक्केच उत्पन्न मिळाले आहे. 179 कोटी 54 लाख रुपयांचे उत्पन्न सहा महिन्यांमध्ये मिळाले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये 39 टक्‍क्‍यांची घट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button