breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनतर्फे पिंपरीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

18 ते 22 मार्च पुरुष व महिला गटात कबड्डी स्पर्धा नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रागणांत होणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे 21 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात 18 ते 22 मार्चपर्यंत होणार आहेत, अशी माहिती युवक व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापाैर मंगला कदम तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आमदार आण्णा बनसोडे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदानूसार 21 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे 12 पुरुष व 12 महिला, तर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे 4 पुरुष व 4 महिला असे एकूण 16 पुरुष आणि 16 महिला संघाना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे. तसेच चिपळूण-रत्नागिरीत झालेल्या 67 व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ज्या पुरुष व महिला संघानी बाद फेरी गाठली अशा 12-12 संघाना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात आले. विदर्भ कबड्डी असोसिएशनचे 4-4 संघाना देखील हाच निकष लावला आहे.

दरम्यान, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना 22 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button