breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत- खासदार संभाजीराजे

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विविध जिल्ह्यात फिरून ते लोकप्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. गुरूवारी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांना न्याय द्यावा, आरक्षण देण्यासाठी सर्वपक्षाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ते करताना दिसत आहेत. यातच आता खासदार संभाजीराजेंनी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा सुमारे अर्धा तास चालली होती. या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील गड संवर्धनाचा विषय देखील होता. तर मराठा आरक्षणावर देखील चर्चा झाली आहे.

छत्रपती शाहू महाराज आणि राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे घनिष्ठ स्नेहबंध होते. आजही छत्रपती घराणं आणि ठाकरे घराण्याचं नातं तितकंच सलोख्याचं आहे. राज ठाकरे आणि माझ्यामध्ये एक दुवा समान आहे, तो म्हणजे गडकिल्ले संवर्धनासाठी काम करण्याचा. राज ठाकरे जातपात मानत नाही, समाजातल्या आर्थिकदृषट्या दुर्बलाला आरक्षण असायलाच हवं, या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

दरम्यान, गुरूवारी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा प्रकट केली होती. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button