breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: महापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत!

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन : धन्वंतरी योजना लागू, शिक्षक संघटनांनी मानले आभार

पिंपरी : महापालिका विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ‘धन्वंतरी’ आरोग्य योजना लागू झाली. शिक्षकांनी आगामी काळात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ रहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शिक्षक संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे.
महापालिका भवन येथे शिक्षक संघटना आणि प्रशासनाची बैठकीत धन्वंतरी योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्या निमित्त शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची कृतज्ञता भेट घेतली आणि या प्रश्नासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय येणारे, अनुसूचित जमातीचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री विलास अंभोरे, पिंपरी चिंचवड मनापा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती श्री शिवाजी दौंडकर, प्राथमिक शिक्षक परिषदेचे सरचिटणीस मंगेश भोंडवे यांच्यासह श्री. सतीश ढमाळ, श्री.  सतीश गिड्डे,  श्री गोरक्षनाथ भांगरे, श्री. धर्मेंद्र भंगे, श्री. बिभीषण फलफले, श्री. शांताराम रोकडे, श्री अनिल सुकाळे, श्री. चौगुले सर, श्री. शंकर पवार, श्री बाबुराव लांघी आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत शिक्षक / सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकास ३०० रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांस १५० रुपये मासिक सभासद वर्गणी कपात करण्यात येईल. त्याआधारे संबंधित कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २०१३ च्या धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ मिळावा. यासाठी लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, हा प्रश्न तांत्रिक कारणास्तव मागे पडला होता. आता शिक्षक संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे मागणी केली. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या धोरणाप्रमाणे महापालिका प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजना लागू केली आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड. 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button