breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

GoodNews: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घसरण, सणासुदीच्या आधीच 6000 रुपयांनी सोनं स्वस्त

नवी दिल्ली: सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झालेली आहे. एमसीएक्सवरील डिसेंबर महिन्यातील वायदा बाजारात सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेले आहे. मागील सत्रात सोन्याच्या भावात एक टक्क्याने वाढ झालेली होती, म्हणजे जवळपास 500 रुपये वाढ होती. तर चांदी प्रति किलो किलो 1,900 ने महागलेली आहे.

7 ऑगस्ट रोजी 56,200 रुपयांची विक्रमी उच्चांकी गाठल्यानंतर सोन्यामध्ये बरेच चढ-उतार झाले आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला सोने 50 हजारांखाली आले होते. जागतिक बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमती घसरण दिसून आली. स्पॉट गोल्डमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्याने घसरून ते 1,896.03 डॉलर प्रति औंस झालेले आहेत. तर, चांदी 0.2 टक्क्यांनी वधारलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button