breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांसाठी Good News : तुमचा मोबाईल नंबर मिळकतीला लिंक करा अन् सामान्यकरात ३ टक्के सवलत मिळवा!

पिंपरी:

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकतधारकांनी आपला मोबाईल क्रमांक मिळकतींना लिंक केल्यास सामान्यकरात तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक लिंक केल्यानंतर महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आणि मिळकतीच्या बिलाची लिंक मोबाईलवरच उबलब्ध करून दिली जाणार आहे.

शहरात एकूण ५ लाख ८८ हजार मिळकती आहेत. त्यातील २ लाख ८० हजार मिळकतधारकांचे मोबाईल क्रमांक मिळकतीशी लिंक झाले आहे. उर्वरित ३ लाख ८ हजार मिळकतधारांनी अद्याप आपले मोबाईल क्रमांक मिळकतींसोबत लिंक केलेले नाही. शहरातील सर्व प्रकारच्या मिळकतींना महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून कराची आकारणी केली जाते. कर भरण्यासाठी शहरात महापालिकेचे १७ करसंकलन विभाग आहेत.

त्याचप्रमाणे ऑनलाइन कर भरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी ऑनलाइन कर भरावा यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी प्रोत्साहनही दिले जाते. त्यामुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन कर भरताना नागरिकांकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला जात आहे. हा क्रमांक मिळकतींना लिंक होत आहे. मोबाइल क्रमांक लिंक झाल्याने मिळकतधारकांना महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आणि दरवर्षी कराच्या बिलाची लिंक मोबाइलवर पाठवले जाते. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सोईचे होणार आहे. जेणेकरून एखादा नागरिक प्रवासात असला तरी तो कर भरू शकेल, हा महापालिकेचा उद्देश आहे.

मिळकतधारकांनी मालमत्ता कराची रक्कम वेळेत भरावी आणि महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तेचे मालक किंवा भोगवटादार यांचे मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीमध्ये जोडणी केलेले नाहीत. मोबाईल क्रमांक अद्ययावत नाहीत, अशा नागरिकांना मालमत्ताकराची बिले, कर भरणा, कर सवलती, नोटीसा, आदेश इत्यादी संपर्क करुन पोहोच करणे, मालमत्ता कर विषयक माहिती, सूचना नागरिकांना प्राप्त होण्यासाठी जे मालमत्ताधारक ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या मिळकतीला मोबाईल क्रमांक लिंक किंवा अद्ययावत करुन थकबाकी व चालू मागणीचे मूळ कराची रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना चालू मागणीतील सामान्यकरात ३ टक्के सवलत देण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button